|
Title: तेथे कर माझे जुळती -- आशा भोसले View count: 2156 Rating: 5.0 (5 ratings) Description: गीत - बा. भ. बोरकर संगीत - वसंत प्रभू स्वर - आशा भोसले चित्रपट - पुत्र व्हवा ऐसा (१९६१) दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती गाळुनिया भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगवती जलदांपरी येउनिया जाती जग ज्यांची न करी गणती यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परी जयांच्या दहनभूमिवर नाहि चिरा नाही पणती मध्यरात्रि नभघुमटाखाली शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी एकांती डोळे भरती ! Tags: old, marathi, film, song, asha, bhosle, vasant, prabhu, b.b.borkar, tethe, kar, maaze, jalatee, Author: dipiaarmarathi |