|
Title: घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा View count: 7332 Rating: 5.0 (20 ratings) Description: गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - सुधीर फडके स्वर - माणिक वर्मा चित्रपट - उमज पडेल तर (१९६०) राग - पहाडी (नादवेध) घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा ! सुटली वेणी, केस मोकळे धूळ उडाली, भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा ! सांजवेळ ही, आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे चंद्र निघे बघ झाडामागे कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा ! Tags: old, marathi, film, song, manik, varma, sudhir, phadke, ghanameela, ladivalaa, Author: dipiaarmarathi |